नागपूर: तलाठीपदासाठी परीक्षा देण्यासाठी आलेले विद्यार्थी केंद्रावरच ताटकळले | पुढारी

नागपूर: तलाठीपदासाठी परीक्षा देण्यासाठी आलेले विद्यार्थी केंद्रावरच ताटकळले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : तलाठी पदासाठी आज (दि.२१) तीन सत्रात तर कुठे दोन सत्रात परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, परीक्षा देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थीना नाहक त्रास सहन करावा लागला. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थी ताटकळत बसले होते. सकाळचा पेपर लांबल्याने दुपारी साडेबारा ते अडीच च्यादरम्यानचे पेपरही खोळंबले. तलाठी परीक्षा सेंटरवर विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली. सकाळी नऊ वाजता पेपर सुरू होणार होता. त्यापूर्वी सात वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडले जाणार होते.

मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थी खोळंबले. यातील बहुतांश विद्यार्थी बाहेरील जिल्ह्यातून आलेले आहेत. सकाळी चार वाजल्यापासून हे विद्यार्थी ठाण मांडून बसले आहेत. हिंगणा एमआयडीसी, टीसीएस केंद्रावर दहा वाजता विद्यार्थ्यांना आत सोडण्यात आले. एकंदरीत तलाठी परीक्षेत सर्व्हर डाऊन असल्याने हा गोंधळ राज्यभरात पाहायला मिळाला. अनेक तरुणांना नोकरी नसल्याने चिंतेत आहेत. तर परीक्षेतही गोंधळ होत असल्याने तरूणांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा 

Back to top button