वर्धा : तांदळाच्या गोदामावर छापा, ४५ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त 

Basmati Rice
Basmati Rice
Published on
Updated on
वर्धा; पुढारी वृत्तसेवा : तांदळाच्या गोदामावर छापा टाकत पोलिसांनी ४५ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
याबाबत मिळालेल्या महितीनुसार, पुलगाव शहरातील महेश श्यामलाल अग्रवाल यांच्या गोदामावर विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने १७ ऑगस्ट रोजी छापा टाकला. पोलिसांना (सी. जी. ०८ ए.एच. ६६६४) ट्रकमधून ३१५४० किलो तांदूळ, (एमएच ३० एव्ही ०४२०) ट्रकमधून २५७२० किलो तांदूळ (सीजी ०८ एई ५४११) ट्रकमधून ३०८९५ किलो तांदुळाचा साठा आढळला. पोलिसांनी १५ लाख ८६ हजार ७९० रुपयांचा ८८ हजार १५५ किलो तांदूळ व ३० लाख रुपये किमतीचे तीन ट्रक असा ४५ लाख ८६ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात पोलीस स्टेशन पुलगाव येथे जिवनावश्यक वस्तू अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पवार तसेच पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संदीप गाडे, पोलीस हवालदार रोशन निंगोळकर, सागर भोसले, अभिजीत गावंडे, मिथून जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, हर्षल सोनटक्के, अभिषेक नाईक, प्रशांत आमनेरकर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news