राज्यातील दुष्काळी स्थितीबाबत बोलताना नाथसागर धरण फक्त 34 टक्के भरले याकडे लक्ष वेधले. शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. 1 रुपयात पीक विमा काढणारे सरकार, कशी मदत करते हे पाहावं लागेल. राज्यात कोरडा दुष्काळ सरकारला घोषित करावा लागेल. 11 जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करावी लागेल.2014 मध्ये मोदींनी मोठ्या घोषणा केल्या. पण आज 9 वर्षानंतर शेतकरी नागवला जात आहे. धान, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला आत्महत्या कराव्या लागत आहे. सरकारला जबाबदारी स्वीकारून काम करण्याची गरज आहे. भरत गोगावले यांच्या स्टेटमेंट नंतर सरकारला शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही हे समोर आल आहे. खालच्या पातळीवर जाऊन राज्य उध्वस्त करायच आहे. भाजपच्या आरोपात दम नाही. कर्नाटकमध्ये हटविलेला पुतळा अनधिकृत होता, त्याचा चेहरा शिवाजी महाराजांशी मिळत नव्हता, त्यामुळे तो हटवला आहे, भाजप सरकारच्या काळात 12 -13 पुतळे हटविले. अभ्यास न करता बोलू नये. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तिघेही कधी एकत्र येत नाहीत. सत्तेच्या हव्यासापोटी राज्याची पत घालविली आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.