चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील दालमिया सिमेंट कंपनीत भीषण आग | पुढारी

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील दालमिया सिमेंट कंपनीत भीषण आग

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : कोरपना तालुक्यातील दालमिया सिमेंट कंपनीमध्ये शुक्रवारी (दि.११) सिमेंट मिलजवळ भीषण आग लागल्याने तीन कॅन्वेअर बेल्ट जळून खाक झाले. वेळीच आग आटोक्यात आणण्याकरीता शर्थीचे प्रयत्न झाल्याने आग कन्वेअर बेल्ट व्यतिरिक्त इतरत्र पसरली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

कोरपना तालुक्यातील नारंडा येथे दालमिया सिमेंट कंपनी आहे. आज (दि. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास कंपनी परिसरातील सिमेंट मिलजवळ सिमेंट पास करणाऱ्या बेल्टला आग लागली. बेल्ट चालू असल्याने आगीची भीषणता वाढत गेली. त्यामुळे कन्वेयर बेल्ट १, २ व ३ हे तिन्ही बेल्ट जळून खाक झाले आहेत. कामगारांच्या म्हणण्यानुसार, बेल्ट चालू असल्याने घासला गेल्याने आग लागल्याची सांगितले जात आहे. कंपनी प्रशासनाने लगेच कंपनीतील फायर ब्रिगेडच्या वाहनांना पाचारण केल्याने, आग नियंत्रणात आणण्याकरीता शर्थीचे प्रयत्न झाले. परंतु, आगीची तीव्रता वाढल्याने अल्ट्राटेक, माणिकगड, अंबुजा येथील फायर ब्रिगेडच्या वाहनांना पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचंलत का?

Back to top button