नागपूर : कुख्यात अब्बूच्या साम्राज्यावर फिरला अखेर बुलडोझर

 नागपूर : कुख्यात अब्बूच्या साम्राज्यावर फिरला अखेर बुलडोझर

 नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या ताजबाग परिसरात कुख्यात गुंड अब्बू खान आणि इतर नागरिकांनी केलेली अतिक्रमणे हटवत आज (दि. ३०) महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. यावेळी मोठा बंदोबस्त असूनही तणावाचे वातावरण होते. ताजबाग हे नागपूरकरांसोबत देशभरातील लोकांचे श्रद्धास्थान असून हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. या ठिकाणी सरकारतर्फे गेल्या काही वर्षात अनेक विकास कामे करण्यात आली. मात्र, अब्बू आणि काही नागरिकांनी त्या ठिकाणी व्यावसायिक अतिक्रमण केले होतं. या साम्राज्यावर अखेर आज बुलडोझर चालवित अतिक्रमण पाडण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news