चंद्रपूर जिल्ह्यात विज पडून ६ जण ठार, ९ जखमी

चंद्रपूर जिल्ह्यात विज पडून ६ जण ठार, ९ जखमी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : विजांच्या कडकडाटासह आज बुधवारी (दि. २६) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यात कोसळलेल्या पावसादरम्यान ब्रम्हपुरी, सिंदेवाही, कोरपना, गोंडपीपरी, पोंभूर्ना व नागभिड या सहा ठिकाणी वेगवेगळ्या घटनांत वीज पडून ६ जण ठार झाले. तर ९ जण जखमी झालेत.  गीता पुरुषोत्तम ढोंगे (४५) बेटाला (ब्रम्हपुरी), कल्पना प्रकाश झोडे (वय ४५), अंजना रुपचंद पुस्तोडे (४८) दोघी रा. देलनवाडी (सिंदेवाही), अशोक पुरुषोत्तम परचाके (कोरपणा ),गोविंदा लिंगा टेकाम ( गोंडपिपरी ),अर्चना मोहन मडावी (वय २७) वेळवा (पोंभुर्णा) अशी मृतकांची नावे आहेत. तर नऊ जण जखमी आहेत.

याबाबत अधिक माहितीनुसार, सध्या शेतीचा रोवणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी शेतमजूर दिवसभर कामावर जात आहेत. आज सकाळ पासूनच शेतकरी शेतमजूर कामावर असताना दुपारी अडीच्या सुमारास  चंद्रपूर जिल्ह्यातील ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला.

ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाला येथील महिला गीता पुरुषोत्तम ढोंगे (४५) ही शेतात निंदनाच्या कामाला गेली होतो. अडीच ते तीनचे सुमारास बेटाला शेतशिवारात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे ही महिला घरी परत येण्यास निघाली. असताना स्त्यात महिलेच्या अंगावर विज पडून ती जागीच ठार झाली. मृतक महिलेच्या पश्चात पती,२ मुली आणि सासू असा परिवार आहे.

सिंदेवाही  तालुक्यातील देलनवाडी शेतशिवारात  रोवनीकरिता गेलेल्या कल्पना प्रकाश झोडे व अंजना रुपचंद पुस्तोडे ह्या दोघी महिला ठार झाल्या तर सुनिता सुरेश आंनदे ही  महिला जखमी झाली. सर्व देलनवाडी येथील आहेत.

गोंडपिपरी तालुक्यात चिवंडा येथे घडली. वनविभागाच्या कामावर असलेल्या गोविंदा लिंगा टेकाम ( गोंडपिपरी ) या वनमजुराचा मृत्यू झाला.  कोरपना तालुक्यातील चनई बु. येथे पुरुषोत्तम अशोक परचाके (२५) या तरुण शेतकरी शेतातील पिकाला किटकनाशक फवारणी करीत असताना वीज पडून मृत्यू झाला.

पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा गावात शेतात काम करताना वीज कोसळल्याने अर्चना मोहन मडावी (वय २७) या महिलेचा मृत्यू झाला तर खुशाल विनोद ठाकरे (वय ३०), रेखा अरविंद सोनटक्के (वय ४५), सुनंदा नरेंद्र इंगोले (वय ४६), राधिका राहुल भंडारे (वय २०), वर्षा बिजा सोयाम (वय ४०), रेखा ढेकलु कुळमेथे (वय ४५) हे जखमी झाले. जखमीं मधील खुशाल ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. नागभीड तालुक्यातील नांदेड येथे रोवणीचे काम सुरू असताना वीज कोसळली. यात सोफिया शेख (१७), महेशा शेख (१६) या दोघी गंभीर जखमी झाल्यात.

सध्या शेतीचे मठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. विजा पडण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.  सद्या चंद्रपूर जिल्ह्यात आरेंज आणि यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे. इशाराच्या पाहिल्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. २९ जुलै पर्यंत हा अलर्ट आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news