भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात बिबट्या ठार! गडेगाव येथील घटना

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात बिबट्या ठार! गडेगाव येथील घटना

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग ओलंडणाऱ्या बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव येथे गुरुवारी (दि. २०) पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली.

भंडारा वनपरिक्षेत्र अंतर्गत कलेवाडा बिटमध्ये कंपार्टमेंट क्रमांक १७० जवळ दोन ते अडीच वर्षाचा नर बिबट राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होता. दरम्यान, अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर बिबट्याला वन विभागाच्या गडेगाव लाकूड आगारात आणण्यात आले. त्याठिकाणी पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके, डॉ. विठ्ठल हटवार यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले.

logo
Pudhari News
pudhari.news