अमरावती : प्रवाशांचे मोबाईल चोरणारा अट्टल चोर गजाआड | Thief stole a mobile phone

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
Published on
Updated on
अमरावती; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बस स्थानकावरील प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या एका अट्टल चोराला रविवारी (दि. १६) दर्यापूरातून अटक करण्यात आली. राजीक शहा रशीद शहा (३२, रा. सुफी प्लॉट, दर्यापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ८१ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
तन्वी रामेश्वर पराडे (१९, रा. हनुमान नगर, आकोट) यांनी १७ मे रोजी दर्यापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दर्यापुर बस स्थानकावरून आकोट बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोराने बॅगमधिल मोबाईल चोरून नेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. यावरून दर्यापूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपासात तांत्रीक माहितीच्या आधारे दर्यापुर येथील रहिवासी आरोपी राजीक शहा रशीद शहा याला बस स्थानकावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने दर्यापुर बसस्थानक परिसरातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे अन्य चार मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून पाच मोबाईल जप्त करून, त्याला मुद्देमालासह दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधिक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक संजय शिंदे व त्यांचे पथकातील अंमलदार त्र्यंबक मनोहर, सुनिल महात्मे, सैय्यद अजमत सैय्यद शौकत, निलेश डांगोरे, अमोल केंद्रे, पोस्टे सायबर सेलचे रितेश वानखडे, चेतन गुल्हाने व चालक निलेश येते यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news