पोलीस सूत्रानुसार, काल (दि. १४) शुक्रवारी फिर्यादी राजू पांडुरंग नंदनवार हे चिमूर आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करीत असताना त्यांच्या शर्टाच्या वरच्या खिशात असलेला 15 हजार किमतीचा मोबाईल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केला. सदर मोबाईल चोरीची त्यांनी चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून अज्ञात आरोपींविरोधात गून्हा दाखल केला. आणि सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपीचा शोध घेणे करिता तपास पथक रवाना करण्यात आले. चिमूर शहरात हजारे पेट्रोल पंपावर चार संशयित एम एच 40-वाय-6496 या क्रमांकाचे वाहनाने आढळून आले. सदर वाहनाची झडती घेणे करिता वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन घेऊन उमरेड रोडनी पळ काढला. पोलीस पथकांने त्याचा पाठलाग करून सदर वाहनास न्यू राष्ट्रीय शाळेजवळ थांबवून वाहनाची झडती घेतली. त्यामध्ये फिर्यादी व्यक्तीचा चोरीस गेलेला मोबाईल व अन्य तीन मोबाईल हँडसेट आढळून आले. त्यामुळे आरोपी नामे धर्मेंद्र गणेश दास कुरील ( वय ५५, रा. रविदास नगर येरखडा कामठी, जि. नागपूर), बलराम कुमार चंद्रदेव महतो (वय 20, रा. नागपूर, मूळ झारखंड) यांना अटक करण्यात आली.