यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ तालुक्यातील एका गावात कामावर नेण्याच्या बहाण्याने दोन आरोपींनी एका महिलेला दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेला तिला विष पाजण्यात आले. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेतील महिलेला पहाटे तिच्या घराजवळ आणून सोडण्यात आले. मात्र, तिची गंभीर अवस्था लक्षात घेऊन तिला यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.