खाते वाटपासंदर्भात वाद नाही प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती 

खाते वाटपासंदर्भात वाद नाही प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती 
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राज्य मंत्रिमंडळातील खाते वाटपासंदर्भात कुठलाही वाद नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी दिली. सरकार मध्ये सहभागी झाल्या पासून अजित पवार यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भेट झाली नव्हती.या भेटी साठीच आम्ही आलो आहे, असे पटेल यांनी स्पष्ट केले.दरम्यान, पटेल आणि अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
भाजप नेत्यांसोबतच्या भेटी दरम्यान मंत्रिमंडळ खाते वाटपाबाबत कुठलीहो चर्चा होणार नाही, असे पत्रकारांशी बोलतांना पटेलांनी सांगितले. आधीची खाती ही भाजप आणि शिसेनेकडे आहेत. कुठले खाते काढून राष्ट्रवादीला द्यायचे आणि संबंधित मंत्र्याला कुठले खात्याचा कारभार द्यायचा याबाबत चर्चा सुरु आहे.
दरम्यान, हसन मुश्रीफ हे वैयक्तिक कामासाठी आल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.भाजप नेत्यांसोबत औपचारिक भेट होणार आहे. यासोबतच १८ जुलैला होणाऱ्या एनडीए च्या बैठकीत सहभागी होणार असल्याचे देखील पटेल म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news