भाजपमधील सर्वाधिक आमदार अस्वस्थ : माजी गृहमंत्री अनिल देशमुख  | पुढारी

भाजपमधील सर्वाधिक आमदार अस्वस्थ : माजी गृहमंत्री अनिल देशमुख 

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : आज सर्वाधिक अस्वस्थ आमदार भाजपमधील आहेत. 105 आमदार निवडून आले आणि मंत्री पाच सहा झालेत. बाहेरचे येऊन मंत्री होत आहे. भाजपचे आमदार सर्वाधिक अस्वस्थ आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आमदार गेले होते. तेसुद्धा अस्वस्थ असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
वर्धेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. त्यापूर्वी अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, ॲड. सुधीर कोठारी, किशोर माथनकर आदी उपस्थित होते.
खातेवाटपासाठी भांडण सुरू असल्याचे कानावर येते. अस्थिर परिस्थिती असून सरकारचा वेळ आमदार सांभाळण्यात जात आहे. सरकारने लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करून महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी कामाला लागावे, असेही अनिल देशमुख म्हणाले.
वरीष्ठ नेते मंडळी पक्षातून गेल्यामुळे अतिशय दुःख आहे. येत्या सात-आठ महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. आता तुमच्याकडे किती आमदार आहेत त्यापेक्षा किती आमदार निवडून येतील हा महत्त्वाचा विषय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी शरद पवार यांच्या सोबत आहे. बदलत्या परिस्थितीत पक्षाची बांधणी करण्यासाठी दौरा आयोजित करण्यात आला आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.

Back to top button