मुख्यमंत्री नागपुरातून तातडीने मुंबईला परतले; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण | CM Eknath Shinde | पुढारी

मुख्यमंत्री नागपुरातून तातडीने मुंबईला परतले; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण | CM Eknath Shinde

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या तीन दिवसाच्या नागपूर, विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने आज (दि. ४) सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात पोहोचले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्यासोबत नागपुरात आले. मात्र राष्ट्रपतींचे विमानतळावर आणि यानंतर राजभवनमध्ये स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

रात्री उशिरापर्यंत याविषयीची कुठलीही स्पष्टता झाली नसली तरी शिवसेना नेते आमदारांची एक बैठक मुंबईत दीपक केसरकर यांच्या ‘रामटेक’ या निवासस्थानी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही बैठक आधीच ठरलेली असल्यामुळे ते मुंबईला परतल्याचे कळते. राष्ट्रपतींच्या दौऱ्यात उद्या (दि. ५) गडचिरोली व कोराडीला मुख्यमंत्री प्रोटोकॉलनुसार हजर राहणार असताना ते अचानक का परतले? यावरून सध्या चर्चेला उधाण आले आहे. अर्थातच उद्या (दि. ५) सकाळी मुख्यमंत्री परत येतात की नाही यावर बरेच काही अवलंबून असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत रामटेकचे खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते.

Back to top button