त्यातील सर्व बियाणांचे पाकीट तपासले असता, यावेळी बाहुबली केजी २५, राशी ६५९, एटीएम, त्रिशूल ७६, वरील भागावर कॉटन सीड्स लिहिलेले, तसेच पाच जी लिहिलेले खालील बाजूला पिंक आर्ट चार लिहिलेले, तसेच त्रिशूल, ३०२८ लिहून असलेले विविध प्रकारचे ४७ अनधिकृत बियाणाचे पाकीट आढळून आले. याबाबत पंचायत समिती पांढरकवडाचे कृषी अधिकारी सुरेश चव्हाण यांनी पांढरकडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक चौकशी पांढरकवडा पोलिस करीत आहेत.