वर्धा : भंगार गोदामाला आग, लाखो रुपयांचे नुकसान  | पुढारी

वर्धा : भंगार गोदामाला आग, लाखो रुपयांचे नुकसान 

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : शहरालगतच्या सेवाग्राम मार्गावरील एमआयडीसी परिसरातील भंगार गोदामाला बुधवारी (दि.७) रोजी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. चार ते पाच तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते.  एमआयडीसी परिसरात वसीम यांचे भंगारचे गोदाम असून भंगार, प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते. येथे सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना पुढे येताच एकच धावपळ निर्माण झाली.

आगीमुळे निघालेला धूर दूरवरून दिसत असल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीमध्ये मशिन आणि इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. येथे वर्धा, सिंदी (रेल्वे), देवळी, पुलगाव, बुटीबोरी एमआयडीसी, भूगाव येथील येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी होत्या. जवळपास तीन ते चार तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलीस अधीक्षक नुरूल हसन, तहसिलदार रमेश कोळपे, प्रवीण हिवरे, मुख्याधिकारी, एमआयडीसी अधिकारी यांनीही घटनास्थळी भेट दिली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. घटनास्थळी खासदार रामदास तडस यांनी भेट देत माहिती घेतली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.

हेही वाचलंत का?

Back to top button