एम्स नागपूरबाबतचे ट्विट सामायिक करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रूग्णालयाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "या कामगिरीबद्दल एम्स नागपूरच्या चमूचे अभिनंदन, ही कामगिरी करत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याचा एक मापदंड स्थापित केला आहे." प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते या रूग्णालयाचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्ये झाले होते हे विशेष.