राष्ट्रवादीचे ओबीसी राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीर; अजितदादा पवार, जयंत पाटील यांची उपस्थिती | NCP OBC Camp | पुढारी

राष्ट्रवादीचे ओबीसी राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीर; अजितदादा पवार, जयंत पाटील यांची उपस्थिती | NCP OBC Camp

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उठ ओबीसी जागा हो.. नव्या क्रांतीचा धागा हो.. असा जयघोष दोन दिवस पहायला मिळणार आहे. शनिवारी (दि.३) आणि रविवारी (दि. ४) जूनला नागपुरात राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरासाठी राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आदी अनेक मान्यवर नेते नागपुरात येत आहेत. 3 जूनला 3 वाजता उद्घाटन समारंभात अजितदादा पवार उपस्थित असणार आहेत. 4 जून रोजी समारोपाला राष्ट्रवादीचे संस्थापक, अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित असणार आहेत. दोन दिवस सुमारे पाचशे ते सहाशे कार्यकर्ते या ओबीसी शिबिरात सहभाग घेणार असून राष्ट्रवादीचे राज्यभरातील ज्येष्ठ नेते या शिबिराला उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

या शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत व लेखक प्रा. हरी नरके, आमदार अमोल मिटकरी, ऍड अंजली साळवे, धनगर समाजाच्या युवा नेत्या सक्षणा सलगर, विकास लवांडे, अविनाश काकडे आदी अनेक मान्यवर ओबीसींच्या विविध विषयावर व सध्याच्या घडामोडींवर मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्ताने परस्परांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग एकत्रितपणे, एका वाहनातून फिरताना दिसत आहे. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, ईश्वर बालबुधे, शेखर सावरबांधे,जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, नूतनताई रेवतकर आदी अनेक पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Back to top button