नागपूर : अनैतिक संबंध... चित्रफित व्हायरल आणि तरूणाची हत्या | पुढारी

नागपूर : अनैतिक संबंध... चित्रफित व्हायरल आणि तरूणाची हत्या

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा मोबाईल शॉपीचा मालक असलेल्या तरुणाने आपल्याच प्रेयसीची आक्षेपार्ह चित्रफीत काढली व तिच्या विवाहनंतर ती व्हायरल केली. या घटनेतून संतापाच्या भरात एकाची हत्या झाल्याची घटना नागपुरात घडली. गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेतील मृतकाचे नाव कपिल भिमराव डोंगरे (वय 35) असे आहे. पोलिसांनी या हत्ये प्रकरणी आरोपी केवल यास (नाव बदललेले) अटक केली आहे.

कपिलची गिट्टीखदान परिसरात मोबाईल शॉपी आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 13 वर्षांपासून कपिलचे केवलच्या बहिणीसोबत प्रेम संबंध होते. बारा वर्षांपूर्वी केवलच्या बहिणीचे छत्तीसगडमध्ये एका व्यवसायिकासोबत लग्न झाले. दरम्यान कपिलचेही लग्न झाले. त्याला दोन मुले आहेत. मात्र लग्नानंतरही कपिलचे केवलच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध कायम होते.

आठवडाभरापूर्वी कपिल छत्तीसगडला मुक्कामी राहून आला. या काळात तिचा पती व मुले बाहेरगावी होते. या काळातील आक्षेपार्ह छायाचित्रे, चित्रफीत काढली आणि दोन दिवसांपूर्वी ती त्याने जावयाच्या मोबाईलवर व परिसरातही व्हायरल केली. त्यामुळे केवल संतापला. मंगळवारी दुपारी केवलने कपिलच्या दुकानात जाऊन या प्रकरणाचा जाब विचारला. यावेळी कपिलने त्याला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर कपिलच्या हातातील काठी केवलने हिसकावून त्याच्या डोक्यावर काठीने वार केले. कपिल रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला व गतप्राण झाला. त्यानंतर केवलने एका मित्राच्या गाडीवर जात गिट्टीखदान पोलीस स्टेशनला आत्मसमर्पण केले.

हेही वाचा : 

Back to top button