

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे महाधिवेशन ७ ऑगस्टला तिरुपती येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी दिली. तायवाडे सांगितले की,या अधिवेशनात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, क्रिमीलेअरची मर्यादा मागील सहा वर्षा पासून वाढली नाही. ती वाढविण्यात यावी, ५०% आरक्षणाची मर्यादा वाढविण्यात यावी, आदी 26 मागण्यांवर चर्चा होणार आहे. त्या पूर्ण करण्याबाबत ठराव पारित करून केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.