यवतमाळ : व्यापाराचे घर फोडले; तीन लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

यवतमाळ : व्यापाराचे घर फोडले; तीन लाखांचा ऐवज लंपास

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : शहरात घराला कुलूप लावणे धोकादायक झाले आहे. लग्नाचा वाढदिवस मुलाकडे साजरा करण्यासाठी ज्येष्ठ दाम्पत्य पुणे येथे गेले होते. मात्र, त्यांना हा आनंद फार काळ घेता आला नाही. चोरट्यांनी घर फोडून रोख रक्कम व दागिन्यांसह तीन लाख १७ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी उघडकीस आली.
सुभाष झांबडमल अग्रवाल हे सहकुटुंब ८ मे रोजी पुणे येथे मुलाकडे गेले होते. त्यांनी घराच्या बाहेरच्या गेटची चावी मोलकरीणकडे ठेवली होती. ती रोज झाडाला पाणी देण्यासाठी येत होती. रविवारी मोलकरीण सायंकाळी ४:३० वाजता झाडाला पाणी देण्यासाठी आली असता तिला घराच्या दाराचे लॅच तुटलेले दिसले, तसेच ग्रीलसुद्धा काढलेली होती. हा प्रकार तिने सुभाष अग्रवाल यांना सांगितला. अग्रवाल यांनी त्यांचा भाऊ ओमप्रकाश याला नेमके काय झाले हे पाहण्यास सांगितले. चोरी झाल्याचे लक्षात येताच सुभाष अग्रवाल सोमवारी सकाळी यवतमाळ मध्ये आले. त्यांच्या घरातून सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, एक डायमंड पोत, डायमंडचे कानातील टॉप्स, चांदीचे शिक्के व इतर साहित्य, रोख ५० हजार, पाण्याचे मीटर असा तीन लाख १७ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button