भंडारा : जावयाचा सासूवर तलवारीने हल्ला

भंडारा : जावयाचा सासूवर तलवारीने हल्ला
Published on
Updated on

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : वर्षभरापासून पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून जावयाने सासूवर तलवारीने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना पवनी तालुक्यातील वलनी येथे घडली. रुपराज मुरारी मंडपे (वय ४१, रा. वलनी) असे आरोपीचे नाव आहे.

रुपराज यांचे गावातीलच महिलेशी लग्न झाले आहे. दरम्यान रुपराज हा दारु पिऊन क्षुल्लक कारणावरुन पत्नीला मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी वर्षभरापासून गावातच असलेल्या आपल्या आईकडे राहत आहे. यामुळे रुपराज हा आपल्या सासु सासऱ्यांना विरोध करत होता. माझ्या पत्नीला आपल्या घरी का ठेवून घेतलं आहे म्हणत त्यांच्या घरासमोर जाऊन शिवीगाळही करायचा. या रागातून २२ मे रोजी सासू गयाबाई मेश्राम या घराकडे जात असताना आरोपी रुपराजने त्यांच्यावर तलवारीने हल्ला करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news