हिंगोली : ४० हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

file photo
file photo
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा सहकारी साखर कारखाना वसाहत येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकास ४० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी ३ वाजता त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. भगवान लहाने असे या मुख्याध्यापकांचे नाव असून एसीबीने शाळेच्या आवारातच ही कारवाई केली.

वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखाना वसाहतीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी विद्यालयात तक्रारदार हे अनुकंपावर नोकरीवर आहेत. त्यांचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यासाठी मुख्याध्यापक भगवान लहाने यांनी ४० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने एसीबीकडे या प्रकरणाची तक्रार केली. एसीबीने पडताळणी करून गुरुवारी शाळेच्या परिसरात सापळा रचला. दुपारी ३ वाजे सुमारास मुख्याध्यापक भगवान लहाने यास विद्यालयाच्या परिसरात ४० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. मुख्याध्यापक लहाने चतुर्भुज होताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश सुळीकर तसेच इतर कर्मचारी उशिरापर्यंत मुख्याध्यापकाची चौकशी करत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news