चंद्रपूर : चिमूर विधानसभा क्षेत्राच्या आमदारांनी घेतली सचिनची भेट | पुढारी

चंद्रपूर : चिमूर विधानसभा क्षेत्राच्या आमदारांनी घेतली सचिनची भेट

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  ताडोबा येथे व्याघ्र दर्शनाकरीता चार दिवसाच्या मुक्कामी आलेल्या मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडूलकर यांची चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी मुक्कामी असलेल्या बांबू रिसार्ट मध्ये भेट घेऊन शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडूलकर हे पत्नी अंजली व काही मित्रांसह गुरूवारी सायंकाळी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारी करीता आले आहे. आज त्यांचा सफारीचा तिसरा दिवस आहे.

उद्या रविवारी ते पुन्हा सफारी करून सायंकाळी परतणार आहेत. काल शुक्रवारी सायंकाळी सफारी करून परतल्यानंतर चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी, चिमूर शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या बांबू रिसार्ट मध्ये रात्री सचिन तेंडूलकर यांची सदिच्छा भेट घेतली. सचिन तेंडूलकर कुटूंबियांची ही ताडोबातील सफारी करण्याची पाचवी वेळ आहे. सचिन हा ताडेाबातील अनेक वाघांचा फॅन आहे. त्यामुळे तो ताडोबा व्याघ्र प्रकल्पात नचुकता सफारी करीता येत असतो.

सचिन ताडोबात सफारी करीता आल्याची माहिती मिळाल्यानंतर काल शुक्रवारी रात्री आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत बांबु रिसार्ट मध्ये जावून सदिच्छा भेट घेतली. सर्वप्रथम पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाल-श्रीफळ देऊन तेंडूलकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता भेट देण्यात आली. आमदार भांगडिया यांनी, ताडोबा, चिमूर विधानसभा क्षेत्राबद्दलची माहिती देऊन तेंडूलकर यांचेशी चर्चा केली. या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश महामंत्री जुनेद खान, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग पिसे, भाजपा युवा नेते समीर राचलवार, भाजयुमो चिमूर शहराध्यक्ष बंटी वनकर, नगरसेवक न.प. चिमूर सतीश जाधव, संजय नवघडे व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचंलत का?

Back to top button