चंद्रपूर : सहा तास सायकल चालवत केला ७३ वा वाढदिवस साजरा | पुढारी

चंद्रपूर : सहा तास सायकल चालवत केला ७३ वा वाढदिवस साजरा

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चिमूर तालुक्यातील नवतळा येथील शाम लांजेवार या सायकल पट्टूने स्वतःचा ७३ वा वाढदिवस सलग सहा तास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सायकल चालवून साजरा केला. वाढत्या वयात सायकल चालवण्याची क्षमता आहे. ती तपासावी या उदेश्याने सायकल चालवून वाढदिवस साजरा केल्याचे त्यांनी सांगितले. नवतळा येथील शाम लांजेवार हे प्रसिद्ध सायकल पट्टू आहेत. त्यांनी अनेकदा सायकल स्पर्धामध्ये भाग घेऊन यश मिळविले. विदर्भातील अनेक जिल्ह्यात सायकलने प्रवास केला. ठिकठिकाणच्या शंकरपटात सायकल शर्यत जिंकली आहे.

काल शुक्रवारी लांजेवार यांचा ७३ वा वाढदिवस वाढदिवस होता. या वाढदिवसी काहीतरी आगळेवेगळे करण्याचे त्यांनी मनात पक्के केले. सायकल पट्टू असल्याने त्यांनी सायकल चालविण्याचा निर्णय घेतला. सायकल चालविण्यामुळे जुन्या स्मृतींना उजाळा मिळावा. तसेच वाढत्या वयात सायकल चालवण्याची क्षमता किती आहे हे तपासण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी सायकल चालविण्याचा निर्णय घेतला. काल शुक्रवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सकाळी 9 वाजता पासून 3 वाजेपर्यंत सलग 6 तास सायकल चालविले.

आगळ्यावेगळ्या पध्दतीने 73 वर्षीय शाम लांजेवार हे सलग सहा तास सायकल चालविणार असल्याची माहिती गावात पसरताच नागरिकांनी पहाण्याकरीता गर्दी केली होती. प्राथमिक शाळेच्या आवारातच नागरिकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत वाढदिवस साजरा करण्यात आला. प्राथमिक शाळेतच वाढदिवसाचा केक कापण्यात आला. अनेकांनी त्यांना केक भरविला. यावेळी गावातील महादेव कोकोडे,सुधाकर खेडकर, प्रकाश वसाके, दीपक कुंभरे, लक्ष्मण सुरणकर, महादेव गुरमुळे सतीश पाठक ,गुरुदास नागोसे आदींसह नागरिक उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button