संजय राऊत यांनी चोंबडेगिरी बंद करावी; नाना पटोलेंचा सबुरीचा सल्ला (Nana Patole) | पुढारी

संजय राऊत यांनी चोंबडेगिरी बंद करावी; नाना पटोलेंचा सबुरीचा सल्ला (Nana Patole)

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते संजय राऊत यांनी चोंबडेगिरी बंद करावी. ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत आणि गांधी कुटुंबावर बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. या कुटुंबाने देशासाठी त्याग केला, बलिदान दिले आहे, पंतप्रधानपद सोडले आहे, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडून दुसऱ्याला दिले आहे”, या शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. (Nana Patole)

पटोले म्हणाले, संजय राऊत आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत. त्यांनी इतर कोणत्या पक्षाचे प्रवक्ते व्हावे, याबद्दल दादा काही दिवसांपूर्वी बोललेच आहेत. त्यामुळे त्यांनी चोमडेगिरी बंद करावी. दरम्यान,पटोलेंच्या या टिकेला संजय राऊत यांनीही उत्तर दिले आहे. “चाटुगिरी कोण करते, हे येणारा भविष्यकाळ ठरवेल. शिवसेनेने कधीही अशी भूमिका घेतलेली नाही. तुम्ही महाविकास आघाडीत आहात, त्यामुळे आपल्या तोंडावर बंधन घाला. आम्ही तुमच्याविषयी बोलू लागल्यास चोमडे कोण आणि चाटू कोण हे कळेल असेही सुनावले आहे. यामुळे एकीकडे शरद पवार यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीत वादळ घोंगावत आहे. दुसरीकडे पटोले आणि राऊत यांच्यातील वाकयुद्धामुळे महाविकास आघाडीत वाद पेटला आहे. या वादाची सुरुवात अर्थातच संजय राऊत यांच्या एका वक्तव्याने झाली. काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत, मात्र निर्णय राहुल गांधींच घेतात असे वक्तव्य राऊत यांनी काल केले होते. ते काँग्रेसला चांगलेच झोंबले असून राऊतांच्या या वक्तव्याचा पटोलेंनी समाचार घेतला. (Nana Patole)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत जाण्याची चूक करणार नाही, अशी आशा पटोले यांनी आज नागपुरातील माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे, त्यामुळे महाविकास आघाडीवर शरद पवार यांच्या राजीनाम्याचा काहीही परिणाम होणार नाही. जे नवे अध्यक्ष होतील ते मविआचे सोबत असतील असा विश्वास आहे. निर्णयासाठी पक्षातील कमेटी तयार झाली आहे ते निर्णय घेतील. शरद पवारांचा राजकारणातील अनुभव मोठा आहे. त्यांनी राजकारणात सक्रिय राहावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे, असेही पटोले म्हणाले. भाजप विरोधात लढण्यासाठी जे आमच्या सोबत येतील, त्यांच्यासोबत आम्ही पुढे जाऊ. महाविकास आघाडी स्थापन करताना शरद पवार सोनिया गांधीकडे गेले होते. किमान समान कार्यक्रमावर हे सरकार स्थापन झाले. मात्र,यासाठी सोनिया गांधी पवारांकडे आल्या नव्हत्या, असेही पटोले यांनी नमूद केले. एकंदरीत येणाऱ्या काळात मविआतील सुसंवादाची कसोटो लागणार हे निश्चित आहे.

हेही वाचा

 

Back to top button