चंद्रपूर : अनुकंप तत्वावर नोकरीकरिता विधवेची दोन मूलासह उपोषण; ६ वर्षांपासून नोकरी देण्यास टाळाटाळ

चंद्रपूर : अनुकंप तत्वावर नोकरीकरिता विधवेची दोन मूलासह उपोषण; ६ वर्षांपासून नोकरी देण्यास टाळाटाळ
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : सेवाकाळात पतीचे निधन झाल्यानंतर वारसांना अनुकंपा तत्वावरील नोकरी न मिळाल्याने मृतक शिपायाच्या पत्नीने दोन मुलांसह काल सोमवार कामगार दिनापासून प्राणांतीक उपोषणाला मुल या तालुक्याचे ठिकानी सुरुवात केली आहे.

स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा मूल, राजोली, अंतरगांव आणि व्याहाड येथे विद्यालयाचे संचलन केल्या जाते. चार संस्थेपैकी एक असलेल्या 100 टक्के अनुदानावरील नवभारत कन्या विद्यालय मूल येथे शिपाई पदावर सेवारत असलेले मुनीम उध्दव सिडाम यांचे 24 ऑगस्ट 2017 रोजी निधन झाले. शासन निर्णयानुसार कर्मचा-याचे सेवाकाळात निधन झाल्यास त्याचे पश्चात कुटूंबातील एका व्यक्तीला सर्वसम्मत अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने मृतक मुनिम सिडाम याच्या पत्नी हर्षकला मुनिम सिडाम यांनी मोठा मुलगा आकाश सिडाम याला संस्थेतंर्गत संचलन होत असलेल्या विद्यालयात रिक्त असलेल्या पदावर अनुकंपा तत्वावर नोकरी दयावी. म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिका-यां सोबतच शिक्षणाधिकारी यांना विनंती केली.

सद्या संस्थेतंर्गत विद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गाचे अनेक पद सेवानिवृत्तीमूळे रिक्त आहेत. त्यामूळे रिक्त असलेल्या चतुर्थ श्रेणी संवर्गात शासन नियामानुसार पत्रव्यवहार करून अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेणे संस्थेला सहज शक्य आहे. परंतू मागील सहा वर्षापासून सतत पाठपुरावा करत असतांना आणि मुलगा शैक्षणीक व शारिरीक दृष्टया पात्र असतांना संस्थेचे पदाधिकारी मूलास अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. असा आरोप करीत मृतक मुनिम सिडाम यांची पत्नी हर्षकला सिडाम यांनी केला आहे. सतत पाठपुरावा करुनही शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी मुलास अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून न घेता अन्याय करीत असल्याने महागाईच्या काळात कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होत आहे. कुटूंबात कोणीही कर्ता व्यक्ती नसल्याने कुटूंब चालवायचा कसा? असा प्रश्न करून न्याय मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हर्षकला सिडाम यांनी काल सोमवार पासून शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालीत मूल येथील विद्यालयासमोर मुलगा व मूलीसह प्राणांतीक उपोषणाला सुरुवात केली आहे.

संस्थेद्वारा संचालन होत असलेल्या पाच विद्यालय आणि महाविद्यालयात शिक्षकेत्तर संवर्गाचे अनेक पद रिक्त आहेत. त्यामूळे संस्थेला शासन निर्णयानुसार आपल्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी देणे सहज शक्य आहे. परंतू संस्थेचे पदाधिकारी असे न करता अनेक बेरोजगार युवकांना रोजंदारी तत्वावर कामावर घेवून बेरोजगारांची पिळवणुक करीत आहे. असा आरोप स्व. मुनिम सिडाम याच्या परिवाराने केला असून महिण्याभरात मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी न दिल्यास नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग स्वीकारू असा इशारा दिल्याने शैक्षणीक वर्तुळात खळबळ माजली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news