नागपूर : इमामवाडा हद्दीत दोघांचा आगीत गुदमरून मृत्यू | पुढारी

नागपूर : इमामवाडा हद्दीत दोघांचा आगीत गुदमरून मृत्यू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आनंद पब्लिक स्कूल येथे दुसऱ्या मजल्यावर एका खोलीत शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत गुदमरून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. आकाश रजत व अमन तिवारी अशी या मृतकांची नावे आहेत.

आकाश रजत व अमन तिवारी हे दोघे मध्य प्रदेशातील शिवनी येथील रहिवासी आहेत. कार्तिकेश शेंडे व अक्षय हे या दोघांचे मित्र त्यांना भेटण्यासाठी आले असता त्यांना हा प्रकार उघडकीस आला. अन्य एका अक्षय नावाच्या मित्राच्या मदतीने मागच्या बाजूची खिडकी उघडण्यात आली यावेळी खोलीमध्ये धूर दाटलेला व भिंती काळवंडून गेलेल्या दिसल्या. समोरची खिडकी उघडल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या दुर्घटनेत दोघांचाही अगीत जळाल्याने जागीच मृत्यू झाला. शाळेचे मुख्याध्यापकांनी परिचित महिलेला ही खोली दिली होती. त्यांचे जावई प्रभात या ठिकाणी वास्तव्याला होते. त्यांच्याकडे कामगार म्हणून हे दोघे तरुण काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Back to top button