विदर्भ तापले! ब्रम्हपूरी ४३.८ अंशाने ठरले राज्यातले सर्वात हॉट शहर; ताडोबा अभयारण्याच्या वेळापत्रकात बदल

heat wave
heat wave
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पूर्वविदर्भात सुर्य दिवसेंदिवस चांगलाच कोपत आहे. मंगळवारी सर्वात जास्त 43.6 अंश तापमान असलेल्या चंद्रपूरला मागे टाकीत ब्रम्हपूरी तालुक्यात सर्वात जास्त तापमान असल्याची नोंद झाली आहे. बुधवारी 0.6 अंशाने तापमानात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली. वाढत्या तापमानामुळे पर्यटकांनाही त्रास होत असल्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाने व्याघ्र अभयारण्यातील सफारीच्या वेळेत बदल केला आहे.

राज्यात कधी नव्हे ते एप्रिल मध्येच चंद्रपूरसह सर्वच जिल्ह्यात तापमान 42 अंशावर गेले आहे. त्यामुळे उष्णतेची लहर निर्माण झाली आहे. नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. चंद्रपूरसह, गोंदिया वर्धा व गडचिरोलीच्या तापमानात मंगळवारी वाढ झाली होती. आज बुधवारी (दि. १९) चंद्रपूरच्या तापमानात 0.8 अंशाने घट झाली असून 42.8 अंश तापमान आहे. तसेच चंद्रपूर येथून जवळच असलेल्या ब्रम्हपूरी येथे देखील आज तापमान 0.6 अंशाने वाढले असून 43.8 अंश इतकी नोंद घेण्यात आली आहे. विदर्भासह राज्यात या शहरातील तापामान सर्वात हॉट शहर ठरले आहे.

विदर्भातील इतर काही शहरातील तापमान

  • गोंदियामध्ये 0.3 अंशाने वाढ होऊन 43.5 अंश इतके तापमान
  • नागपूर मध्ये 0.8 अंशाने वाढ होऊन 42.0 अंश इतके तापमान
  • गडचिरोली मध्ये 1 अंशाने वाढ होऊन 41.6 अंश इतके तापमान
  • वर्धामध्ये 0.6 अंशाने घटल्याने 42.5 अंश इतके तापमान
  • वाशीममध्ये 1.2 अंशाने घटल्याने 40.8 अंश इतके तापमान
  • यवतमाळमध्ये देखील घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. 42.0 अंश इतके तापमान
  • अकोला व अमरावतील मध्येही घट झाली असून अनुक्रमे 42.4 व 42.2 अंश इतके तापमान
  • विदर्भात चाळीशीच्या आत असलेल्या बुलढाणा मध्ये 0.4 अंशाने वाढ होऊन 39.6 अंश इतके तापमान

तापमान वाढीमुळे ताडोबा अभयारण्याच्या वेळापत्रकात बदल

देशात उष्ण शहर म्हणून ओळखल्या चंद्रपूरातील तापमानाचा फटका ताडोबा सफारीकरीता येणाऱ्या पर्यटकांना बसणार आहे. चंद्रपूरातील वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका लक्षात घेता ताडोबा व्यवस्थापनाने कोअर झोनमध्ये सफारीच्या वेळांमध्ये बदल केले आहे. ताडोबा अभयारण्यातील सकाळ व सायंकाळच्या सफारीच्या वेळात बदल करण्यात आलेली आहे. यापूर्वी सकाळी 6.30 ते 10.30 या वेळात असणारी सफारी आता 5.30 ते 9.30 यावेळेत होईल. सकाळी 1 तास लवकर सफारी सुरू होणार आहे. तसेच दुपारी 2.30 ते 6.30 या वेळातील सफारी आता 3 .00 ते 7.00 यावेळात होईल. सायंकाळी सफारी 1 तास सफारी उशिरा सुरू होणार आहे. हा बदल ताडोबाच्या कोअर झोनमध्ये उद्या 20 एप्रिलपासून लागू होणार आहे. बफर झोन मध्ये पूर्वीप्रमाणेच सफारी होणार असल्याचे ताडोबा व्यवस्थापनाने कळविले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news