यवतमाळ : भरधाव ट्रकची ऑटोला धडक: मायलेकी ठार, सात जखमी

यवतमाळ : भरधाव ट्रकची ऑटोला धडक: मायलेकी ठार, सात जखमी

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : वणी येथून शिंदोलाकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटोला भरधाव ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात मायलेकी जागीच ठार झाल्या. तर ऑटोतील सात प्रवासी जखमी झाले. गुरूवारी (दि,६) रोजी सायंकाळी वणी-कोरपना मार्गावरील आबई फाट्यावर ही घटना घडली. मायलेकीच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संजीवनी अनंता नागतुरे (वय ३५), अवनी अनंता नागतुरे (वय ४, रा. कुर्ली) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मायलेकीची नावे आहेत.

याविषयीची अधिक माहिती अशी की, शिंदोला येथील ऑटोचालक सुनिल बोंडे याने गुरूवारी दुपारी त्याच्या ऑटोमध्ये वणी येथून काही प्रवासी घेवून निघाले होते. दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही ऑटो वणी-कोरपना मार्गावरील आबई फाट्याजवळ आल्यावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. यावेळी ट्रक शिंदोलाकडून मोहदाकडे जात होता. या अपघातात ऑटोमधील संजीवनी, अवनी नागतुरे या मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सात प्रवासी जखमी झाले.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. वणी पंचायत समितीचे माजी सदस्य संजय निखाडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर कनाके यांच्यासह अनेकांनी पुढे येऊन जखमींना उपचारासाठी खासगी वाहन व एका रुग्णवाहिकेद्वारे वणी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. यातील काही जखमींना चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच, शिरपूर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत मृत संजीवनी नागतुरे या महिलेची मुलगी अवनीला घेवून वणी येथे एका कार्यक्रमाला आली होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर ऑटोने दोघीजणी कुर्ली गानी जात असताना काळाने मायलेकींवर घाला घातला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news