

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा वर्षानुवर्ष आमच्यासोबत राहणारे उद्धव ठाकरे आज अशा महापुरुषांच्या विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, केवळ सत्तेसाठी हे आंधळे झाले आहेत. उद्धवा काय होतास तू काय झालास तू… अशी उपहासात्मक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. सावरकर गौरव यात्रा समारोप निमित्ताने ते बोलत होते.
कधीकाळी मनीशंकर अय्यर यांना जोडा मारण्यासाठी पुढाकार घेणारे बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे कुठे ? वारसा जन्माने नव्हे तर कर्तुत्वाने मिळत असतो. उगीचच बोलू नका. बेगडी प्रेम थांबवा. याकडे लक्ष वेधत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली.
सत्ता येईल, जाईल पण उद्या इतिहासात तुम्ही सावरकरांच्या विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसला याची नोंद होईल हे विसरू नका. मला तुम्ही फडतूस म्हणाला, मात्र लक्षात ठेवा उद्धव ठाकरे मी फडतुस नाही काडतूस आहे. झुकेगा नही, घुसेगा… असा पुष्पा स्टाईल इशारा त्यांनी थेट देऊन टाकला. गेले दोन दिवस या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप कमालीचे पराकोटीला गेले आहेत हे विशेष.
हेही वाचा :