अकोला: माना येथे खोदकामात सापडल्या जैन मुनींच्या मूर्ती | पुढारी

अकोला: माना येथे खोदकामात सापडल्या जैन मुनींच्या मूर्ती

अकोला: पुढारी वृत्तसेवा : मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे शुक्रवारी (दि. 31) खोदकामात दगडांच्या तीन मूर्ती सापडल्या. 14 मार्च 1986 रोजीही याच ठिकाणी खोदकाम करताना जैन मुनींच्या मूर्ती सापडल्या होत्या. त्या मुर्त्या नागपूरच्या म्युझियम मध्ये ठेवल्या आहेत. शुक्रवारी दुपारी येथील रमेश इंगोले यांच्या घरी ह्या मूर्ती सापडल्या.

याचा सुगावा जैन समाजाच्या लोकांपर्यंत पोहचला. त्यांनी आमदार हरीश पिंपळे यांच्याशी संपर्क साधला. आमदार पिंपळे पोलिस ताफ्यासह माना येथे पोहोचले. खोदकामात दगडांच्या तीन मूर्ती सापडल्या असून अजूनही उत्खनन सुरू आहे. आमदार हरीश पिंपळे यांनी ज्या ठिकाणी मूर्ती निघाल्या आहेत. त्या ठिकाणी जैन मंदिर बांधून देण्याचे आश्वासन दिले. तसेच ज्या ठिकाणी लोक राहतात. त्यांचे पुनर्वसन करून त्यांना इतर ठिकाणी घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी ठाणेदार कैलास भगत, पटवारी भारती, पोलिस पाटील संजय देशमुख, सतीश मोखटकर, सचिन कोकणे, राहुल नागपुरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button