नागपूर : यूट्यूब पाहून केली स्वत:ची प्रसूती; पण जन्म दिलेल्या बाळाचा केला गळा दाबून खून!

नागपूर : यूट्यूब पाहून केली स्वत:ची प्रसूती; पण जन्म दिलेल्या बाळाचा केला गळा दाबून खून!
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे सोशल मीडिया जगाला जोडणारे प्रभावी माध्यम ठरले आहे. दुसरीकडे नव्या पिढीत त्याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणावर केला जात असून तो जीवघेणा ठरत आहे. बऱ्याचदा यूट्यूब बघून केलेले प्रयोग घातक ठरले आहेत. अनेकांना प्रसंगी जीवाची किंमतही मोजावी लागली आहे. नागपूर शहरात असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीने यूट्यूबवर बघून स्वतःची प्रसूती घरीच करवून घेतली. तसेच बाळाची गळा दाबून हत्या देखील केल्याची घटना घडली.

युट्युबवर पाहून स्वत: च प्रसुती करुन बाळाला जन्म दिला आणी त्यानंतर अल्प बाळ ओरडू नये, आपले बिंग फुटू नये म्हणून तिनेच गळा दाबला. या सर्व प्रकारात बाळ तर दगावलेच, शिवाय या मुलीची प्रकृतीही खालावली. मोलमजुरी करणाऱ्या आईला हा प्रकार घरी आल्यावर लक्षात येताच तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरला आहे.

हा संपूर्ण घटनाक्रम नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या या अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर ठाकूर नामक एका तरुणाशी ओळख झाली. एक- दोन महिन्यांच्या चॅटिंगनंतर आरोपी तरुणाने तिला मित्राकडे भेटण्यासाठी बोलावले. या भेटीदरम्यान दारू पाजून दबाव टाकत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. खरंतर या भेटीनंतर दोघे भेटलेही नसल्याचे सांगतले जाते. पण ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. ३ मार्चच्या रात्री तिची प्रसूती झाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस मुलीपर्यंत पोहोचले. तिची प्राथमिक विचारपूसही केली. पण, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने चौकशीत मर्यादा आल्या आहेत. तूर्त पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या मुलीच्या जबाबानंतरच पोलिसांची पुढील कारवाई होणार आहे. आरोपीचे हे नाव इंस्टाग्रामवरील आहे की वेगळेच यादृष्टीने देखील पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. बाळाचा मृत्यू देखील संशयास्पद असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमधूनच सत्य पुढे येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news