विजय शिंदे त्यांची पत्नी ऋतुजा आणि चिमूकला देवांशु हे दुचाकीने (क्र.एम. एच. २७ ए. डब्ल्यू. ७४०१) जळका जगताप येथून देवरी येथे जाण्यासाठी निघाले. दुपारी ३ वाजताच्या दरम्यान ते शिराळा मार्गे देवरी येथे जात असताना त्यांच्या मागून कुटार घेऊन जाणारा भरधाव ट्रक (क्र.एम. एच. २७ बी.एक्स ५०६६) अनियंत्रित झाल्याने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये विजय आणि ऋतुजा हे दाम्पत्य जागीच ठार झाले. तर चिमुकला देवांशु हा जखमी झाला. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी तातडीने माहुली जहागीर पोलीस स्टेशनला माहिती दिली. माहिती मिळताच माहुली जहागीर पोलीस स्टेशन पीएसओ मिलिंद सरकटे, एएसआय टोकमुरके, एएसआय अघाडे, धर्माळे, पो कॉ विनोद वाघमारे हे घटनास्थळी दाखल झाले.