नागपुरात विमानाचे इमर्जन्सी लँडिंग | पुढारी

नागपुरात विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मस्कतला जाणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय विमानाचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री अकराच्या सुमारास इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. ओमानच्या सलाम एअरवेजचे हे विमान असल्याची माहिती मिळाली.

नागपूरच्या आकाशात असताना या विमानाच्या वैमानिकाला धूर विमानातून धूर निघत असल्याचे दिसल्याने त्याने तातडीने नागपूरच्या हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला व विमान उतरवण्याची परवानगी मागितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नागपूर एटीसीने तातडीने हे विमान उतरवण्याची परवानगी दिली. सुरक्षित विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.रात्री उशिरापर्यंत या विमानाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अधिक तपशील मिळू शकला नाही. प्रवाशांची पर्यायी व्यवस्था केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button