चंद्रपुरात दोन अट्टल चोरट्यांना अटक | पुढारी

चंद्रपुरात दोन अट्टल चोरट्यांना अटक

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात ठीक ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हेशाखेने केली आहे. मुजाहीद उर्फ मुज्जु आहत शेख (वय २३), शहबाज उर्फ गोलु सादीक शेख (२१, दोन्ही रा. जलनगर वार्ड) असे आरोपींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासुन चंद्रपुर शहरात घरफोडीचे प्रमाण वाढले होते. स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या अट्टल गुन्हेगारांना अटक करण्याच्या सूचना पोलीस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते. त्यामुळे पोलीस निरिक्षक महेश कोंडावार व चंद्रपूर शहरातील घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. एका विशेष पथकाद्वारे गुन्हेगारांवर सापळा लावून होते. काल स्थानिक गुन्हेशाखेच्या विशेष पथकाला गोपनिय माहिती मिळाली होती.

आरोपी जिल्हा कारागृहाजवळील सराफा लाईन कोतवाली परिसरात बिना कागदपत्राचे सोन्याचे दागिने विक्री करण्याकरीता आले होते. विशेष पथकाद्वारे सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली. त्यांचे कडून सोन्याचे दागिने एकूण वजन ३९.८३० ग्रॅम व एक मोबाईल असा एकूण १ लाख ८२ हजार २९७ चा माल जप्त करण्यात आला. या आरोपींनी ७ महिण्यापूर्वी चंद्रपूर शहरातील घुटकाला वार्ड परिसरातील सोन्याचे दागिने चोरल्याचे सांगितले. त्यांचे सोबत त्यांचा सहकारी तनवीर रोशन शेख हा सहभागी होता. त्याचेकडे उर्वरीत घरफोडीतील चोरलेले दागिने असून तो फरार आहे. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींवर यापूर्वी नाबालीक असताना घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button