चंद्रपूर : सावली तालुक्यांतील 48 गावांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी | पुढारी

चंद्रपूर : सावली तालुक्यांतील 48 गावांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  सावली तालुक्यातील गाव खेड्यातील पिण्याचे पाण्याची समस्या कायम स्वरुपी मिटणार आहे. ४८ गावातील नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणार आहे. माजी मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत सुमारे ९० कोटींच्या नळ पाणी पुरवठा योजनाचे कामांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी २१ गावांना नळ योजनेचे कामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सलग दोन वर्षे कोरोना वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जग हैराण झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्याची तत्कालिन आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी जीवाची परवा न करता राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. कोरोना संकट टाळण्यासोबतच विकास कामांवर भरही दिला. अशाच विकास कामांपैकी एक असलेल्या ब्रह्मपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील एकूण ४८ गावांना दूषित पाणी पुरवठ्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्याचेच फलित ९० कोटींचा निधी मंजूर करून घेण्यास यश आले आहे. त्यामूळे त्या ४८ गावांना शुद्ध पिण्याचा पाण्याचा पप्रश्न निकाली निघणार आहे.

जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत प्रस्तावित असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनमध्ये बोरमाळा पाणीपुरवठा योजना अंदाजित किंमत १३८.३९ लक्ष, डोनाळा५७.९६ लक्ष, विहीरगाव ९८.११ लक्ष, आकापूर १००.९८ लक्ष, जनकापुर (तुकूम)३७.४७ लक्ष, सोलर आधारित दुहेरी पाणी पुरवठा योजना मध्ये सिंगापूर, खानबाद (चक) सावंगी(दीक्षित) उमरी, थेरगाव ७७.५२ लक्ष,सायखेडा ८८.४७ लक्ष, गेवरा (खुर्द)९८.६९ लक्ष, डोंगरगाव (मस्के)१२०.१७ लक्ष, मेहा (बुज)११५.२० लक्ष, बेलगाव ९३.२७ लक्ष , जांम (बुज) १४५.१९ लक्ष,कडोली ९२.९२ लक्ष, उसेगाव६५.९६ लक्ष, गायडोंगरी ७८.५६ लक्ष, करोली ११६.४५ लक्ष, कसरगाव ९७.७१ लक्ष, तर प्रादेशिक पाणीपुरवठा योजने अंतर्गत बोथली पाणीपुरवठा योजना अंदाजित किंमत ६४६.९६ लक्ष, साखरी प्रादेशिक योजना अंदाजित किंमत ३५०.७५ लक्ष, व्याहाड (बूज) प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंदाजित किंमत ५००.५४ लक्ष, व्याहाड (खुर्द) योजना अंदाजित किंमत ४९८.४८ लक्ष, पाथरी प्रादेशिक योजना अंदाजित किंमत १७००.२६ लक्ष यासह इतर एकूण 48 गावांचा समावेश आहे. माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचा विकासात्मक दृष्टिकोन व नागरिकांप्रति असलेली सद्भावना तसेच दीर्घ अनुभवातून मतदारसंघातील ग्राम खेड्यातील समस्या जाणून घेत शासन स्तरावर मंजूर करून घेतलेल्या सदर नळ योजना कामामुळे हजारो नागरिकांच्या शुद्ध पेजलाची समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे.

Back to top button