यवतमाळ: ‘व्हॅलेंटाईन’ दिवशीच प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा

यवतमाळ: ‘व्हॅलेंटाईन’ दिवशीच प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेम व्यक्त करीत प्रेयसीला भेट वस्तू देण्याऐवजी प्रियकरावर पोलीस कोठडीत जाण्याची वेळ आली. प्रेयसीच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकित सोयाम (वय २४, रा. गणेशपूर) असे अटक झालेल्या प्रियकराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी मारेगाव येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुमारे पाच वर्षांपूर्वी अंकितची नात्यातीलच एका तरुणीशी नजरानजर झाली. सुरुवातीला मैत्री आणि त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, पाच वर्षानंतर या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून खटके उडू लागले. काही दिवसांनंतर प्रेयसीने अचानक त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे प्रेयसीने नातेवाईकांसह थेट मारेगाव पोलीस ठाणे गाठले.

तेव्हा प्रियकर लग्नासाठी तयार झाला. दोन्ही बाजुच्या नातेवाईकांनी या लग्नासाठी होकार दिला. मात्र, तरुणीच्या एका नातेवाईकाने नकार दिला. तरुणीनेही प्रियकराविरोधात पोलिसांना तक्रार नोंदविण्यासाठी आग्रह धरला. त्यानंतर प्रियकर अंकित सोयाम याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news