नागपूर : मच्छर मारण्याच्या औषधाने चिमुकलीचा मृत्यू

नागपूर : मच्छर मारण्याच्या औषधाने चिमुकलीचा मृत्यू

Published on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अनेकदा लहान मुलांपासून ही वस्तू दूर ठेवा असे या उत्पादनांवर नमूद केलेले असते. तरी देखील पालकांचे याकडे कधीकधी होणारे दुर्लक्ष किती महागात पडू शकते याचे उदाहरण सोमवारी (दि. १३) पाहायला मिळाले. एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा डास मारण्याची औषधी तोंडात गेल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.

सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेतील मृत चिमुकलीचे नाव दिव्या चौधरी असे आहे. दीड वर्षाची ही चिमुकली पलंगावर घरी खेळत होती. खेळता खेळता मच्छर मारण्याचे कॉइल तिने तोंडात घातले व ती चाटायला लागली अबोल अशा दिव्याला आपण काय करतो याची कल्पना नव्हती. काही वेळातच तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेने परिसरात व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news