नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघ सध्या नागपुरात आहे. या संघाची, आयोजकांची नागपुरात जोरदार तयारी सुरु असताना माजी कर्णधार विराट कोहलीच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या ट्वीटवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आपला नवा कोरा फोन हरवला असून तो कोणाला सापडला का, असा प्रश्न कोहलीने ट्विटच्या माध्यमातून केला आहे. अर्थातच नागपुरात खळबळ माजली असली तरी हा फोन केव्हा व कुठे हरवला, याची कुठलीही माहिती त्याने दिलेली नाही. मात्र, कोहली नागपुरात असल्याने हा प्रकार नागपुरात घडला असावा, असे कयास लावले जात आहेत. (Virat Kohli's Lost New Phone)