चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन रोखपालास सक्तमजुरी शिक्षा | पुढारी

चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन रोखपालास सक्तमजुरी शिक्षा

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदावर कार्यरत असताना रोखपालाने ३ कोटी ६३ लक्ष, ३९ हजार, ८६० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यादंडाधिकारी ऋषीकेश दिपक हिंगणगावकर यांनी सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. तसेच संबंधित आरोपीला अपहार केलेल्या रक्कमेची नुकसान भरपाई करण्याचे आदेश दिले आहेत. माजी रोखपाल निखील अशोक घाटे असे आरोपीचे नाव आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यवस्थापक फिर्यादी रजनी संजय सपाटे यांनी याबाबत रामनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. बँकेत रोखपाल या पदावर कार्यरत असलेले आरोपी निखील अशोक घाटे यांनी पदाचा गैरवापर करुन बँकेतील खातेदारांनी जमा केलेली ६९ लाख ६७ हजार ८०५ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केला. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचेकडे सोपिवण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने विहीत मुदतीत अपहार प्रकरणाचा तपास पुर्ण करुन आरोपी निखील घाटे याने ३ कोटी ६३ लाख ३९ हजार ८६० रूपये रुपयाचा अपहार केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीविरोधात प्रथम श्रेणी न्यायालयात (चंद्रपूर) दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ऋषीकेश दिपक हिंगणगांवकर यांनी, या गुन्ह्याचे तपासातील उपलब्ध दस्ताऐवज पुरावे, हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल, तपासातील एकुण ३४ साक्षदार तपासले. यामध्ये बँक अधिकारी,कर्मचारी, हस्ताक्षर तज्ञ, सायबर तज्ञ यांची साक्ष महत्वाची ठरल्याने प्रथम श्रेधी न्यायालयाने आरोपी निखील अशोक घाटे यास ३ वर्ष सक्त मजुरी, तसेच  दीड वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच अपहार केलेल्या रक्कम आरोपीकडून न मिळाल्याने २ कोटी ८६ लाख १२५ रूपये नुकसान भरपाई भरण्यास आदेश दिले आहेत.

हेही वाचंलत का?

Back to top button