वर्धा : निवास व्यवस्था हाऊसफुल्ल, वर्धेकर करणार साहित्य संमेलन पाहुण्यांचे आदरातिथ्य | पुढारी

वर्धा : निवास व्यवस्था हाऊसफुल्ल, वर्धेकर करणार साहित्य संमेलन पाहुण्यांचे आदरातिथ्य

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वर्धा येथे येणारे साहित्यिक, रसिक, पाहुण्यांसाठी हॉटेल्स तसेच इतर निवासाच्या व्यवस्था आरक्षित करण्यात आल्यात. पण, येणार्‍या पाहुण्यांची, रसिकांची संख्या बघता ही निवास व्यवस्था हाऊसफुल्ल झाली आहे. निवास व्यवस्था हाऊसफुल्ल झालेली असल्याने वर्धेकरांनी आता पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी हात पुढे केला आहे. वर्ध्यात येणार्‍या पाहुण्यांची गैरसोय होऊ नये, याकरिता त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे.

शहरातील सर्वच हॉटेल्स, निवासी व्यवस्था असलेली ठिकाणे साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने पूर्वीच आरक्षित करण्यात आली आहेत. पाहुणे, निमंत्रित, साहित्यिक, रसिक तसेच साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने येणार्‍यांची संख्या वाढत आहे. वर्ध्यापासून नागपूर जवळच अंतरावर आहे. यवतमाळही जवळच्याच अंतरावर आहे. नागपूर शहरात मोठे हॉटेल्स उपलब्ध आहेत.

वर्ध्यात ही संख्या मर्यादीत आहे. मोठ्या संख्येने पाहुणे, साहित्यिक, रसिक येणार असल्याने आयोजकांच्या वतीने निवासाकरिता असलेली ठिकाणी आरक्षित केल्यानंतरही यामध्ये संख्या वाढत आहे. आयोजकांना निवासाबाबत विचारणा होत असून, निवासाची व्यवस्था करताना कसरत होत आहे. आता अनेकांनी पाहुण्यांना नातलग, ओळखीचे मित्र यांच्याकडे निवासव्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यातून संमेलन पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button