चंद्रपूर : महिला काँग्रेसचे रामदेव बाबा यांच्या विरुद्ध आंदोलन | पुढारी

चंद्रपूर : महिला काँग्रेसचे रामदेव बाबा यांच्या विरुद्ध आंदोलन

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : महिलांना उद्देशून आपत्तीजनक विधान केल्याबद्दल योगगुरू रामदेव बाबा यांचे चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ढोकाली येथील हायलँड भागात शुक्रवारी पतंजली योगपीठाच्या वतीने आयोजित महिला योग संमेलनात रामदेव बाबा यांनी महिलांबाबत आपत्तीजनक विधान केले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यासुद्धा उपस्थित होत्या. रामदेवबाबा यांच्या विधानाच्या तीव्र प्रतिक्रिया राज्यात उमटत असून चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृवात शनिवारी चंद्रपुरात आंदोलन करण्यात आले.

रामदेव बाबांच्या या विधानाचा तीव्र निषेध करत रामदेवबाबांनी सर्व महिला वर्गाचा अपमान केला. एका संत म्हणणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून हे विधान शोभत नाही. त्यामुळे ते संत नसून असंत आहेत. रामदेव बाबा याने संत या शब्दाला काळीमा फासला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करून त्याच्या प्रतिमेला काळे फासले. आपण सुद्धा महिलेच्या गर्भातून जन्म घेतला, हे रामदेव बाबा विसरले आहेत. त्यांनी महिलांविषयी इतके आपत्तीजनक व खालच्या पातळीचे वक्तव्य केले, असा हल्लाबोल जिल्हाध्यक्ष ठेमस्कर यांनी  यावेळी केला. सोबतच जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी यांच्याकडे रामदेव बाबा यांच्या विरोधात लेखी तक्रार सुद्धा देण्यात आली आहे.

या आंदोलनाला सेवादल महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष लता बारापात्रे, सिंदेवाहीच्या तालुका अध्यक्ष सीमा सहारे, गोंडपीपरीच्या तालुका अध्यक्ष रेखा रामटेके, चंद्रपूर सोशल मीडियाचे जिल्हाअध्यक्ष मुन्ना तावाडे, इंजी नरेंद्र डोंगरे प्रीती सागरे, संगीता शंकरपाल, पुष्पा सिडाम, निमंत्रीता कोकोडे, पुष्पा मडावी, नंदा नरसाळे, अंकु बाई भुक्या, छाया शेंडे, नेहा मेश्राम, मंगला शिवरकर, मेहेक सय्यद, सीमा धुर्वे, माला माणिकपुरी, रिया रॉय, शालू दास, ममता मेश्राम, अविनाश मेश्राम, स्वप्नील निमगडे, विजय कांबळे, सारंग चालखुरे, मिलिंद रामटेके, प्रकाश देशभ्रतार, शिवम गोरघाटे, बिराज नारायने यांची उपस्थिती होती.

हेही वाचलंत का?

Back to top button