

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : पथ्रोट येथील प्रगतिशील शेतकरी, कापड व्यावसायिक लक्ष्मीनारायण चांडक यांचा संगणक अभियंता असलेला मुलगा चिराग यांचा बंगळूरजवळ कार अपघातात मृत्यू झाला होता. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी घडली होती. याबाबतची माहिती गावात कळताच शोककळा पसरली होती. दरम्यान, काल (दि.२१) दुपारी १२ वाजता चिरागच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चिराग (वय 24) हा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून बंगळूर येथे नोकरीला होता. शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने चिराग हा त्याच्या आठ मित्रांसोबत फिरण्यासाठी स्कॉर्पिओ वाहनाने निघाला होता. तत्पूर्वीच त्याने आई वडिलांना फोनवरून माहिती दिली होती. बंगळूर शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. यात तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच मित्र गंभीर जखमी झाले. चिराग हा दिवाळीत गावी आला होता.
हेही वाचलंत का ?