चंद्रपूर : अपघातात सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : अपघातात सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर मूल मार्गावरील जानाळा आगडी गावाजवळ झालेल्या अपघातात ६० वर्षीय सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पोलीस उपनिरक्षकाची पत्नी व वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी (१३ ऑक्टोबर) घडली. माणिक कुमरे असे मृत्यू झालेल्या सेवानिवृत्त पोलीस उपनिरक्षकाचे नाव आहे.

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गुरुवारी स्वत:च्या वाहनाने प्रवास करीत होते. चंद्रपूर-मूल मार्गावरील जानाळा आगडी गावाजवळ स्विफ्ट गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयसर गाडीने समोरा समोर जबर धडक दिली. अपघात भीषण असल्याने स्विफ्ट गाडीमध्ये असलेले सेवानिवृत्त माणिक कुमरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनात बसलेल्या सेवानिवृत्त पोलीस उपरीक्षकाची पत्नी आरती माणिक कुमरे व वाहनचालक हेमंत मेश्राम हे दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना मूल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सदर घटनेची माहिती मूल पोलिसांना दिल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यांनी सर्वप्रथम कुमरे यांचा मृतदे ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीला पाठविला. जखमी अवस्थेत असलेल्या वाहन चालक व सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचे पत्नीला तातडीने रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button