गोंदिया : मजितपूर घटनेच्या चौकशीचे सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश | पुढारी

गोंदिया : मजितपूर घटनेच्या चौकशीचे सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश

गोंदिया; पुढारी वृत्तसेवा : मजितपूर (ता. गोंदिया) येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रकमधून प्रवास केल्याने अस्वस्थ वाटू लागले. या घटनेची गंभीर दखल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांना तत्काळ उपचार मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या मजितपूर (ता. गोंदिया) येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी सडक अर्जुनी तालुक्यातील कोयलारी येथे गेले होते. स्पर्धा संपल्यानंतर परतीचा प्रवास ट्रकमधून केल्यामुळे काही विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचे वृत्त माध्यमात प्रसारित झाले. या घटनेतील विद्यार्थ्यांना उपचारासाठी एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. या वृत्ताची तत्काळ दखल पालकमंत्र्यांनी घेतली असून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार सुरू करावेत, असे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून दिले आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button