नागपुरात जोरदार पाऊस; विदर्भात पुढील चार दिवस यलो अलर्ट (Video) | पुढारी

नागपुरात जोरदार पाऊस; विदर्भात पुढील चार दिवस यलो अलर्ट (Video)

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात आज (सोमवार) पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील २४ तासांपासून नागपुरात सुरू असलेल्या संततधारेमुळे सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. तसेच अनेक रस्‍त्‍यांवर पाणी साचल्‍याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हवामान विभागाकडून नागपुरात पुढील काही दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नागपूर शहरासह विदर्भात परत एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. पुढील चार दिवसांसाठी विदर्भात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच त्यानंतरसुद्धा विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची अपेक्षा आहे.

पुढील काही दिवसांसाठी हा अलर्ट असून, यात वादळी पावसासह काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये १३ सप्टेंबरपर्यंत सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर १४ आणि १५ सप्टेंबर रोजी पाऊस थोडाफार कमी होईल. मात्र, त्या काळातसुद्धा विदर्भात वादळी पाऊस राहू शकतो. पुढे १६ ते २१ सप्टेंबर या काळातही विदर्भात सर्वदूर चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या काळात विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button