अकोला : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या युवकास जन्मठेप | पुढारी

अकोला : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या युवकास जन्मठेप

अकोला; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करणा-या अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजनी बु. येथील २३ वर्षीय युवकाला अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेसह १ लाख १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. उल्हास पुंजाजी चव्हाण असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणातील उल्हास पुंजाजी चव्हाण  याने २९ सप्टेंबर २०१७ रोजी अजनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.  बार्शी टाकळी पोलिस स्टेशनला कलम ३७६ (२) (१) भादंवी , ३ (अ), ४ पोस्को ॲक्टनुसार त्‍याच्‍यावर गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणाचा तपास पीएसआय पठाण यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यानंतर आज दि. १६ जुलै रोजी अकोला जिल्हा अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांनी निकाल देत आरोपीला दोषी ठरवून आजन्म कारावासासह १ लाख १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अधिवक्ता किरण खोत तर कोर्ट पैरवी म्हणून पोहेकॉ प्रदिप पिंजरकर तर सीएमएस सेलचे अधिकारी म्हणून एएसआय प्रवीण पाटील यांनी काम पाहिले.

हेही वाचलंत का? 

Back to top button