नागपूर : चार लहान मुलांना दिले एचआयव्हीबाधितांचे रक्‍त; एकाचा मृत्‍यू, आरोग्‍यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश | पुढारी

नागपूर : चार लहान मुलांना दिले एचआयव्हीबाधितांचे रक्‍त; एकाचा मृत्‍यू, आरोग्‍यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : लहान मुलांना देण्यात आलेल्या रक्तातून चार जणांना एचआयव्ही बाधितांचे रक्त दिल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. यात एका बालकाचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण आणखी गंभीर झाले आहे.

महाराष्ट्राला हादरवणारी घटना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातून समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील चार मुलांना ‘ब्लड बँके’तून एचआयव्ही झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात एका बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र हा मृत्यू एचआयव्ही बाधित रक्ताच्या संक्रमणामुळेच झाला की अन्य कारणांमुळे याबाबत कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तातडीने या प्रकरणी चौकशीचे आदेश आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. २३ मे रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे नागपुरात असतानाच त्यांनी या प्रकरणी चौकशी चे आदेश दिले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार लहान मुलांना ब्लड बँकेतून एचआयव्ही झाला. ही मुलं थॅलेसेमिया या गंभीर आजाराने ग्रस्त होती. या चौघांचे रिपोर्ट एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, थॅलेसेमिया या गंभीर रक्ताच्या आजाराशी ही मुलं तोंड देत होती. असे असताना या चिमुकल्यांना ‘ब्लड बँके’तून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीची लागण झाली. ही अतिशय गंभीर बाब आहे.

हे ही वाचलंत का?  

Back to top button