

अमरावती ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात महाविकास आघाडी सरकार विरोधात सातत्याने बोलणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने वाय प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. त्यांच्या सुरक्षेत सीआरपीएफचे ११ जवानांचे सुरक्षा कवच संपूर्ण भारतात लागू राहणार आहे.
लोकसभेत राज्य सरकार विरोधात सातत्याने आवाज उठवित असलेल्या खासदार राणा यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर एजन्सीने (आयबी) ने केंद्रीय गृह मंत्रालयाला दिला. त्याचे गांभीर्य लक्षात घेता गृहमंत्री अमित शहा यांनी वाय सुरक्षा प्रदान केली आहे.
या सुरक्षेत एक बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कार्पिओ दिली जाणार आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत वाय प्लस श्रेणी सुरक्षा कर्मचारी शहरात दाखल होणार असल्याची माहिती खासदार यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.