

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाण्यातील (महाराष्ट्र) एका व्यक्तीला टिंडरवर टिंडर या डेटिंग ॲपवर भेटलेल्या मुलीसोबत डेटवर जाणे महागात पडले आहे. रेस्टॉरंटने दिलेल बिल पाहून त्याला धक्काच बसला आहे. त्याला बिल तब्बल ४४,००० रुपये आले आहे. Tinder date
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका व्यक्तीला टिंडर या डेटिंग ॲपवर एका मुलीची ओळख झाली. ओळखीनंतर ते १२ जून रोजी डेटवर एका रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथे त्याने तिच्यासोबत वेळ घालवला, रपूर खाल्लं आणि प्यायलं, पण जेव्हा रेस्टॉरंटनं त्याला बिल दिलं तेव्हा त्याला धक्काच बसला. बिल होत तब्बल ४४,८२९ रुपये.
त्या दोघांनी रेस्टॉरंटमध्ये १८ जेगरबॉम्ब कॉकटेल, दोन रेड बुल्स, फ्रेंच फ्राई, खारवलेले शेंगदाणे, चार चॉकलेट ट्रफल केक आणि एक खास मिक्स ऑर्डर केले होते. खाल्यानंतर बिल आले. त्याने कल्पना केली नव्हती त्याच्यापेक्षा कितीतरीपटीने बिल आले होते. ४४,८२९ रुपये बिल पाहिल्यानंतर त्याला धक्काच बसला. त्यानंतर त्याने पोलिसांना बोलावले. पोलिस आल्यानंतर त्या व्यक्तीला थोडा दिलासा मिळाला. पोलिस आल्यानंतर बिल ४००० रुपयांनी कमी करावे लागले. मात्र त्याला ४०,००० रुपये बिल द्यावे लागले. Tinder date
बिल सोशल मिडियावर व्हायरल होवू लागले आहे. बिल पाहिल्यानंतर सोशल मिडियावर संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे. माझ्या मासिक पगाराऐवढे हे बिल आहे. तर एकजण म्हणत आहे ही लोक मेन्यू कार्ड का पाहत नाही.